आपल्या चांगल्या किंवा वाईट मनस्थितीची व त्यातूनच येणारे विचार, स्म्रुती व द्रुष्टीकोन यांची जबाबदारी स्वीकारुया.
Category: Uncategorized
शिकायला:
जीवन रोमांचक बनवणाऱ्या गोष्टी छोट्या, समान्य व दैनंदिन असतात, आपल्याला फक्त त्यातील चांगली बाजू पहायला शिकायला हवं.
विकास:
बाह्य जगातील साधनसामग्रींबरोबरच अंतरंगातील व अंतर्मनातील साधनसामग्रींचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास.
मदत:
तणावपूर्ण परिस्थितीत आपली बुद्धीमत्ता व आपले तर्कशास्त्र आपल्याला साथ देत नाहीत म्हणून इतरांची मदत घेऊया.
झटपट:
संकटकालीन परिस्थितीत आपल्या झटपट व स्वयंचलित प्रतिक्रिया काय काय असतात? यांवर विचार व चिंतन करूयात.
वाटत रहाणे:
प्रेम मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याची मागणी करणे सोडून देणे व ते परत मिळण्याची अपेक्षा न ठेवता ते वाटत रहाणे.
समतोल:
शिक्षण आपल्याला स्पर्धात्मक बनवते व जीवन आपल्याला सहकार्यात्मक बनवते, तर जीवन शिक्षण म्हणजे दोन्हींचा समतोल.
सिद्ध:
कसल्याही परिस्थितीत व काहीही करून, स्वतःलाच बरोबर सिद्ध करण्याची पराकाष्टा म्हणजे अपयशाची खात्री.
पण:
एक “पण?” आपले आत्मविकासाचे सर्व मार्ग बंद करून टाकतो, तर दुसरा “पण!” आत्मविकासाचे अनेक मार्ग खुले करतो.
मार्गाने:
यशस्वी व समाधानी जीवनाची बस व्हाया आपल्या चुका, मूर्खपणा व कमतरता यांमधून शिकत राहण्याच्या मार्गाने जाते.