काही कारणांनी आपण आनंदी होत असू, तर सावधान, काही कारणांनी आपण दुःखीही होऊ शकतो, आनंदाला कारण कशाला?
भावना:
जीवनात नकारात्मक भावना कमी करण्याचा मार्ग म्हणजे स्वीकारभाव व सकारात्मक भावना वाढवण्याचा मार्ग म्हणजे धन्यवादभाव.
निर्धास्त:
ज्या कल्पनांमुळे आपले मन निर्धास्त होते पण शरीर व बुद्धी कामाला लागते, त्या कल्पना आपल्या अंतर्मनाच्या तळाशी स्थिरावतात.
आवश्यक:
आपली ध्येयं पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आपले अंतर्मन आपल्याकडून करवून व बनवून घेत असते.
रूजवण्यासाठी:
एखादी आदर्श गोष्ट आपल्या अंतर्मनात खोलवर रूजवण्यासाठी त्या गोष्टीसोबत स्वतःची सतत कल्पना करत राहूयात.
अधिग्रहण:
बाह्यमनाची अवस्था शांत, निवांत, क्रियाविहीन, स्तब्ध व स्थिर असतानाच, अंतर्मन आदर्श कल्पना व प्रतिमा यांचे अधिग्रहण करते.
थारा:
आपल्या मनात आपण अशा विचारांना व कल्पनांनाच थारा देऊया ज्यामुळे आपल्याला आरोग्य, बळ, सुख व प्रेरणा मिळेल.
शब्द:
आपण स्वतःशी बोलताना वापरलेले शब्द, ऐकायला प्रेमळ व आल्हाददायक तसेच, अंतःकरणाला व ह्रदयाला सुखदायक असावेत.
योग्य:
जेव्हा आपल्याला समस्यांमध्ये, नुकसान दिसण्याऐवजी आपले फायदेच दिसतात, तेव्हा आपला द्रुष्टीकोन योग्य समजावा.
निवड:
ऐकलेल्या व वाचलेल्या विचारांमधील फक्त विधायक, सद्भावपूर्ण व रचनात्मक विचारांचीच निवड अंतर्गत प्रक्रियेसाठी करूयात.