व्यावहारीक जगतातील प्रतिमा जपणे, दिखाऊपणा करणे, प्रतिक्रिया देणे आणि प्रदर्शन करणे, अंतर्गत जगतामध्ये कुचकामी ठरते.
जन्म:
गोष्टी ठरावीक पद्धतीने, ठरावीक ठिकाणी व ठरवलेल्या वेळी घडणारच असे गृहीत धरून आपण भ्रमनिरास व तक्रारी यांना जन्म देतो.
त्रास:
आपल्याला होणारा जवळपास सर्व त्रास, आपल्या स्वतःच्या मनाच्या गडबडीमुळे, बडबडीमुळे व गैरसमजामुळे होतो.
व्यस्त:
नात्यामध्ये जाणवणारे प्रेम व जिव्हाळा, आपले स्वतःचे नात्यामधील हेतू, अपेक्षा आणि बंधनं यांच्याशी व्यस्त प्रमाणात असते.
आकलन:
आक्रमक पवित्रा घेणे, हे खरे तर स्वतःच्या मनाचे संरक्षण करणे, मनाला वाचवणे असते, कशापासून? व का? याचे आकलन करूयात.
मोजणी:
आपल्या जीवनात असलेल्या, आपल्याला मिळालेल्या व आपण मिळवलेल्या गोष्टींचीच मोजणी करण्याचा संकल्प करूयात.
ओळखणे:
जीवनातील असत्य व आभास वेळीच ओळखणे व त्यांना सद्सद्विवेकबुद्धीने प्रेमपूर्वक पण ठाम नकार देता येणे म्हणजे खरे शहाणपण.
बनवतात:
मिथ्या, मोह, माया व क्षणभंगुर असे आपले जीवन नाही, आपण निवडलेले समज, मान्यता, द्रुष्टीकोन व विचार जीवनाला तसे बनवतात.
आपोआप:
आपले विचार आपले जग बनवतात, आपले जग आपले विचार पक्के करतात, म्हणून आदर्श जग ठरवूया विचार आपोआप येतील.
सुरुवात:
जीवनप्रवासातील कोणत्याही मार्गाची आपली सुरुवात “अज्ञात ते ज्ञात” अशी असेल तर शेवट “ज्ञात ते अज्ञात” असा असेल.