इतरांची रेडिमेड मते विचारांती स्विकारता येणे किंवा नाकारता येणे किंवा नवीन मते बनवून मार्ग निवडता येणे म्हणजे खरे स्वातंत्र्य.
न्याहाळूया:
नातेसंबंधात आपलं स्वतःचं करणं व वागणं, आपल्या स्वतःच्या मनाची व विचारांची जडणघडण व आपलं स्वतःचं अंतरंग न्याहाळूया.
हवं:
आपल्याला जे काय हवं आहे, त्याची जाणीव ठेवूयात, तसेच त्याची नेमकी, नेटकी व भरीव व्याख्या, कल्पना व विचार करूयात.
इच्छेविरूद्ध:
नुसतं बसून राहणे, दिवास्वप्न पाहणे किंवा जे हवंय त्याचा पोकळ विचार करणे म्हणजे अंतर्मनात आपल्या इच्छेविरूद्ध कार्य करणे.
सत्य:
आपण ज्या गोष्टींना, मनापासून सत्य समजून चालतो, त्या प्रत्यक्ष घडवून आणणारी आपल्या आतील शक्ती, म्हणजे आपले अंतर्मन.
अनुभव:
आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देतो, ज्या शब्दांना कान देतो व ज्या द्रुष्यावर नजर स्थिर करतो, त्या वाढत जाऊन आपले अनुभव बनतात.
आग्रह:
ज्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला बरं किंवा छान वाटतं, त्या गोष्टी आपल्या स्वतःच्या अंतर्गत जगातील असण्याचा आग्रह धरूया.
चाके:
भूतकाळातील शहाणपण वेचणे व भविष्यकाळातील निसंदिग्ध आदर्श बघणे, ही सजग वर्तमानाकाळाची दोन चाके आहेत.
आचरण:
दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात ज्या वाईट भावना असतील त्या लगेच काढून टाकण्यासाठी, क्रुतज्ञतेचे आचरण करूया.
सूर:
नातेसंबंधातील सुसंवादाचे सुमधूर गाणे भेसूर करणारे दोन सूर म्हणजे तक्रारीचा सूर व मीपणाचा सूर, ते टाळायला शिकूया.