आपण अधूनमधून आपल्या मनाच्या आरश्यात डोकावून पहावयास हवे यासाठी की तिथे आंतरिक शहाणपण किती प्रमाणात आहे.
भाग:
पैसे नसल्याची, कमी पडण्याची किंवा संपण्याची भीती व त्यातून येणाऱ्या विचारांनी आपल्याला कामधंदा करायला भाग पाडू नये.
मेळ:
आपल्या मनांमधील विचार व आपल्या भावनांमधील विचार, यामध्ये आपल्या जीवनाला अनुकूल असा, मेळ घालायला शिकूयात.
आदर्श:
जी आदर्श कल्पना आपल्याला अंतर्मनात ठेवायची आहे त्याबद्दलची जाणीव, श्रद्धा, भावना, व एकाग्रता गुणवत्तापूर्ण ठेवूया.
शोध:
सकाळी कामाला जातेवेळी आपल्याला काय वाटते? कटकट व वैताग की उत्साह व जिज्ञासा, शोध घेऊया, विचार करूया.
मनापासून:
आपल्याला मनापासून काय वाटते, हे आपल्या तात्पुरत्या भावनांपेक्षा व क्षणिक प्रतिक्रियांपेक्षा, जास्त महत्त्वाचे आहे.
आपलं:
आपलं काय व कुठं चुकतंय ते शोधणं, त्याचा स्वीकार करणं आणि ते बदलण्यासाठी प्रयत्न करणं हा विकासाचा राजमार्ग आहे.
काल्पनिक:
आपल्याला मागे ढकलणाऱ्या व दडपून टाकणाऱ्या, जवळपास सर्व प्रकारच्या भीती, न दिसणाऱ्या व काल्पनिक असतात.
ऐपत:
आपलं स्वतःचं मन ठरवतं तीच आपली ऐपत असते, ना कमी ना जास्त, ती वाढवण्यासाठी मनाला प्रशिक्षित करूयात.
वाटतात:
हे जग, जीवन, लोक व नातेसंबंध दिसतात तसे नसतात, तर आपल्या मनाला वाटतात तसे असतात, म्हणून सावध होऊया.