आपली प्रत्येक क्रुती काहीतरी मिळवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी किंवा दोन्हीसाठी असते, या साठी जाणून घेणे म्हणजे आत्मज्ञान.
पावणे सापडणे:
ज्या गोष्टी बाह्यजगात असतात त्या आपल्याला सापडतात, ज्या आजीवन आपल्या अंत:करणात असतात त्या आपल्याला पावतात.
उगम:
डोक्याला शॉट देणाऱ्या तापदायक भावना, आपल्या अव्यवहार्य आणि अवास्तव विचार, समजूती, मान्यता व ग्रुहितकं यांमधून उगम पावतात.
सुविचार:
ज्या विचारांमधून सर्वांमध्ये आनंद, प्रेम, उत्साह आणि प्रेरणा या भावना तयार करणारे वर्तन उपजते, ते सर्व विचार चांगले, सुविचार.
जोडणे:
“पण, परंतु, किंतु” हे शब्द फक्त दोन वाक्ये जोडतात, दोन मने नाही, म्हणून समोरासमोरच्या संभाषणात त्यांचा वापर कमीतकमी व्हावा.
आत्मसंतुष्टी:
आत्मसंतुष्टी हा आत्मविकासाच्या मार्गावरील पहिला अडथळा आहे, तो पार केल्यावर पुढील प्रवास सुरु होतो.
स्वागत:
बदलांचे हसतमुखाने स्वागत करणेच योग्य, कारण आपण स्वागत केले नाही म्हणून ते यायचे थांबत नाहीत.
कारण व परिणाम:
कारणांमध्ये रुची दाखवल्यास कार्यकारणभाव व समजूतदारपणाचा उगम होतो, परिणामांमध्ये रुची दाखवल्यास हटवाद व ताठर भूमिकेचा उगम होतो.
चुका:
आपल्या चुकांवर पांघरूण घालणे व सारवासारव करणे, म्हणजे आपला नवीन काही शिकण्याचा मार्ग अडवून धरणे.
अज्ञानी:
एखाद्या विषयाचे जितके खोल ज्ञान व माहिती, आपण माहीत करून घेऊ, तितके आपण जास्त अज्ञानी, माहिती नसलेले व नम्र बनू.