पारख:

कोणीतरी जबरदस्ती काम करून घेणे, पर्याय नाही म्हणून काम करावे लागणे किंवा काम करण्याचा पर्याय निवडणे यांमधील वेगवेगळ्या जाणीवा व अनुभव यांची पारख करायला शिकूया.

निर्णय:

तात्कालीन परिस्थिती व भावना यांवर विसंबून निर्णय घेण्यापेक्षा आपण अगोदर ठरवून ठेवलेल्या आपल्या खोल मूल्यांवर आधारित निर्णय घ्यायला शिकूया.

स्वप्न:

वरवर आपण आपले स्वप्न काहीही व कितीही दाखवले तरीही, जे खरोखरच आपल्या अंतर्मनामध्ये आहे, तेच आपल्या स्वप्नातून, वास्तवात व्यक्त व प्रकट होत जाते.

त्याग:

आपल्याला पुढे भविष्यात जे उच्च ध्येय हवं आहे, यासाठी आत्ता जे काही ध्येयविरोधी हवं आहे, त्या इच्छांचा, त्याग करण्याची आपली क्षमता वाढवूया.