जर आपण दुसऱ्याचा पाणउतारा करण्याने समाधानी होणारे असू तर ह्या तोट्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणारे होऊया.
तारीफ:
ज्यांच्याकडून आपल्याला निष्ठा व सहकार्य हवे असते त्यांच्या नवीन कल्पना, सूचना व त्यांची बुद्धिमत्ता यांची तारीफ करायला शिकूया.
समजून:
चूक की बरोबर, योग्य की अयोग्य, वैध की अवैध, न्याय्य की अन्याय्य हे ठरवण्याच्या नादात समोरच्या माणसाला समजून घेणे बाजूला राहते.
सुवचन:
आपल्या मनाला खोलवर भिडलेले सुवचन व सुविचार, आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात.
पाठिंबा:
वरिष्ठ किंवा कनिष्ठ, ज्यांच्याबरोबर आपण दररोज काम करतो, त्यांच्याबद्दल सकारात्मक बोलायला व त्यांना पाठिंबा द्यायला शिकूयात.
उद्या:
आज आपण जसे बोलत व वागत आहोत, अगदी तशाच प्रकारे आपला मुलगा किंवा मुलगी उद्या बोलणार वागणार आहे, हे लक्षात ठेवूया.
समाधानी:
जे आपल्याला मिळाले आहे त्याबद्दल आपण समाधानी असावे, परंतु जसे आपण आहोत त्याबद्दल मात्र समाधानी असू नये, सुधारवादी असावे.
अटी व शर्ती:
आपल्या जीवनाला व जगण्याला अटी व शर्ती लागू करणे म्हणजे आपले आयुष्य त्रासदायक, दुःखी व कटकटींचे करणे.
वाव:
आपल्या अव्यक्त क्षमता, आवडी, वकूब, ताकदी, आत्मविश्वास, लायकी, प्रतिमा, चारित्र्य यांमध्ये थोड्याफार विकासाला नेहमीच वाव आहे.
स्वीकार:
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गूढ व रहस्यमय गोष्टींची कारणमिमांसा करत बसण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करणे सर्वोत्तम.