उपकार भावनेची, परतफेडीची, कौतुकाची, मैत्रभावनेची किंवा क्रुतज्ञतेची अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करायला शिकूयात.
जीवन:
ज्या बाबींमध्ये आपल्याला रस व आवड आहे, त्या बाबींमध्ये स्वतःला गुंतवून टाकणे व जे होईल त्याचा स्वीकार करणे म्हणजे यशस्वी जीवन.
विश्वास:
आपण स्वतः स्वतःला जो विश्वास देतो, तो आपल्या अंतर्मनासाठी आज्ञावली असतो, तो खरा ठरू शकतो, हे सत्य समजून घेऊया.
वागणूक:
इतर लोकांना व नातलगांना एखाद्या मोठ्या व महत्वाच्या माणसासारखी वागणूक दिल्याने त्याचा व आपला फायदाच फायदा होईल.
प्रात्यक्षिक:
ओरडणे, गुरकावणे, दबाव टाकणे, खरडपट्टी काढणे, मूर्खात काढणे यांपेक्षा काय करावे याचे प्रात्यक्षिक दाखवणे व कौतुक करणे कधीही उत्तम.
सहकार्य:
कठोर टीका करून अपमान करण्याऐवजी प्रिय लोकांना आत्मविश्वासाने उभे करून त्यांचे सहकार्य मिळवायला शिकूया.
डायरीलेखन:
आपण मोठे आहोत आणि आणखी मोठे होत आहोत अशी आठवण करवणारे डायरीलेखन किंवा मनःचित्रीकरण करायला शिकूया.
संतुलित:
संतुलित शरीर, संतुलित ह्रदय, संतुलित मन, संतुलित आत्मा आणि संतुलित बुद्धी हे आपल्या समाधानकारक जीवनाचे रहस्य आहे.
पाया:
यशाची उंच, भव्य व प्रशस्त अशी इमारत ज्या पायावर दिमाखात उभी राहू शकते, तो भक्कम पाया म्हणजे सकारात्मक स्वःप्रतिमा.
यश:
कोणतीही नवीन गोष्ट सुरू करून त्यात यश संपादन करण्यासाठी वाढत्या वयाची आडकाठी कधीही नसते.