क्षणोक्षणी आपण मनाला जे काही सांगतो किंवा मन आपल्याला जे काही सांगते, तेच आपण कोणत्या काळात जगत आहोत हे ठरवत असते, हे समजून घ्यायला शिकूया.
पायरी:
आपण इतरांबद्दल शुभ विचार व शुभ चिंतन करणे ही आपले स्वत:चे शुभ, कल्याण व चांगले होण्यासाठीची पहिली व खूप गरजेची पायरी आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
निर्भय:
निर्भय होणे म्हणजे कधीही न घाबरणे असे नव्हे, तर भितीतील आंतरिक ऊर्जेचे रूपांतर, काही विधायक व रचनात्मक ऊर्जेत करायला शिकणे, हे समजून घ्यायला शिकूया.
गोळाबेरीज:
यशस्वी आयुष्य म्हणजे आपल्या मनातील वेगवेगळ्या भीत्यांना व काळज्यांना चितपट करण्यासाठी आपणच शोधलेल्या नानाविध मार्गांची गोळाबेरीज, हे समजून घ्यायला शिकूया.
ग्रहण:
जे काम आपल्याला बिलकुलच आवडत नाही, ते काहीतरी दुसऱ्या एखाद्या फायद्यासाठी जबरदस्तीने करणे, म्हणजे आपल्या आनंदाला ग्रहण लावणे आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
गरज:
‘करुणा, प्रेम व दया’ देणाऱ्यांनी ती घेणाऱ्यांबरोबरच, ती देणाऱ्यांबरोबरही रहावे, नेहमी देणाऱ्याला सुध्दा त्यांची कधीतरी गरज पडू शकते, हे समजून घ्यायला शिकूया.
समस्या:
आपल्या कल्पना, मान्यता, विचार व दृष्टीकोन यांतून काल्पनिक समस्या तयार होतात तर प्रत्यक्ष कृतीतून मात्र वास्तविक समस्या तयार होतात, हे समजून घ्यायला शिकूया.
शत्रू:
दिशाहीन, अस्तित्वहीन व तर्कहीन मान्यतांतून तयार होणारे आपले आचार-विचार व आहार-विहार हेच आपले सर्वात मोठ्ठे शत्रू आहेत, हे समजून घ्यायला शिकूया.
जागेवर:
प्रश्नातून प्रश्न तयार करणाऱ्या पुनपून्हा गोलगोल फिरवणाऱ्या विचारांच्या जागेवर पर्याय तयार करणाऱ्या व गोलाबाहेर पडायला मदत करणाऱ्या विचारांना निवडायला शिकूया.
वळवायला:
गडबडीत निरुद्देश व नकारात्मक प्रतिक्रिया देण्यात वाया जाणारी आपली भावनिक ऊर्जा वाचवून हळूहळू ती स्व:जाण, स्व:जागृती व स्व:विकास या सत्कार्याकडे वळवायला शिकूयात.