मोठी व महान:

आपल्याला जर कोणी मोठी व महान व्यक्ती बनायचे असेल तर मोठ्या व महान व्यक्तींनी तोंड दिलेल्या मोठ्या अडचणींना तशाच प्रकारे व त्याच मूळ कारणांसाठी सामोरं जायला सुरुवात करायला शिकूया.

लेखले:

आपण जर इतरांना कमी लेखले तर इतरांकडून आपल्याला मोठे व ज्ञानी लेखले जाण्याऐवजी कमी व अज्ञानी लेखले जाण्याचीच शक्यता जास्त असणार, हे समजून घ्यायला शिकूया.

वैयक्तीक:

आपले स्वतःचे वैयक्तीक प्रश्न व समस्या दुसऱ्यांना दोष देऊन, त्यांच्या उणिवा शोधून किंवा त्यांना घालूनपाडून बोलून कधीही सुटू शकणार नाहीत, हे समजून घ्यायला शिकूया.

किंमत:

आपली किंमत आपल्या स्वतःच्या एखाद्या चुकीच्या कृतीमुळे, इतर कोणाच्यातरी नजरेत कमी किंवा जास्त होण्यामुळे ती लगेचच बदलू शकत नाही, हे समजून घ्यायला शिकूया.

हट्ट:

आपल्याला महत्वाची, योग्य व बरोबर वाटणारी गोष्ट आपल्या जवळच्या इतरांनाही अगदी तशीच वाटावी हा हट्ट धरणे आपण शांतपणे कमी करायला सुरुवात करूयात.

सुरूवातीसाठी:

कोणत्याही कामाच्या चांगल्या सुरूवातीसाठी सर्वात प्रथम जी गोष्ट अतिशय आवश्यक आहे, ती म्हणजे “आपल्या मनाची तयारी व त्यातील आपल्या मनाची एकाग्रता” हे समजून घ्यायला शिकूया.

भेट:

एखाद्या समस्याग्रस्त किंवा दुःखी माणसाला भेटायला जाताना भेट म्हणून “त्यांच्यासाठी चांगली व खास अशी एखादी माहिती किंवा बातमी”, सोबत घेऊन जायला सुरुवात करायला शिकूया.

ताकद:

आपली सगळ्यात मोठी ताकद किंवा कमजोरी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा आपले अंदाज, गणित व अनुमान असतात, हे समजून घ्यायला शिकूया.

वाटायला:

आजूबाजूचे लोक आपल्याला वारंवार दुःखी, उदास, नाराज व वैफल्यग्रस्त वाटायला लागले तर, आपण स्वतः त्याच व तशाच मनःस्थितीत असण्याची शक्यता आहे, हे समजून घ्यायला शिकूया.

मूड:

आपला मूड चाळणीचे काम करतो, त्यातून फक्त आपल्या सध्याच्या मूडला अनुरूप चाळलेल्या विचार व आठवणीच आपल्या समोर हजर होतात, म्हणून आपल्या मूडवर लक्ष ठेवायला शिकूयात.