ताणतणाव असताना त्याबाबत “काय करता येणार नाही?” यापेक्षा “काय करता येईल?’ इकडे लक्ष केंद्रित करायला शिकूयात.
मौन:
आपल्याला इतरांबद्दल ज्या भावना आहेत, जे म्हणायचे आहे, ते सांगता येत नसेल तर, न बोलता मौन पाळायला शिकूयात.
अनुमाने:
एखाद्याच्या हातून आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून व चाललेल्या गोष्टीवरून अनुमाने काढणे, आपण टाळायला शिकूयात.
संदिग्ध:
“ठाम” राहण्यापेक्षा “संदिग्ध” रहाणे बरे, आपण नवा विचार, नवी कल्पना, नवी उत्तरे आणि नवे ज्ञान शोधायला सुरूवात करू शकतो.
संघर्षमुक्तीचा:
संघर्षाच्या व वादविवादाच्या काळात आपला पवित्रा व आपली भूमिका बदलणे हा संघर्षमुक्तीचा सर्वोत्तम असा मार्ग आहे.
योग्यच:
इतरांनी दिलेले “सर्व प्रकारचे प्रतिसाद योग्यच असतात”, असे समजून इतरांशी बोलायला व वागायला शिकण्याचा प्रयत्न करूयात.
मत्सर:
काहीतरी साध्य करण्यासाठी प्रयत्न करताना, आपल्या मार्गावरील सर्वांत मोठा अडथळा; ते मिळवणाऱ्यांबद्दल आपल्याला वाटणारा मत्सर.
कल्पनेनुसार:
आपल्या कल्पनेनुसार आपण जे कोणी व जसे काही आहोत, त्यांच्याप्रमाणेच व तसेच आपले मन, बुध्दी व स्मरणशक्ती काम करत असते.
विचार:
आपले कायमचे, मूळ व आदर्श विचार, आपल्याला आता काय वाटतंय या तात्पुरत्या, बेगडी व अनाठायी विचारांखाली गाडले जाऊ शकतात.
परस्परसंबंध:
परस्परसंबंध सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे दुसऱ्यांच्या जागी स्वतःला समजून व त्यांच्या द्रुष्टीने विचार करून बोलणे व वागणे.