आपल्या रोजच्या कामात रस वाटावा, याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यातून आपल्या “आंतरिक विकासाच्या संधी” शोधत रहाणे.
समान:
समान वैशिष्ट्ये व गुण असणाऱ्या लोकांमध्ये, एकमेकांच्या मनात संवेदना, सहवेदना व नाजूक जागा निर्माण करण्याची ताकद असते.
घर:
‘मनात घर’ करून बसलेल्या गोष्टींची ‘घरघर’ समजून उमजून बंद केल्याशिवाय, आपण आपल्या ‘घरात’ बिनधास्त ‘घोरू’ शकत नाही.
तिऱ्हाईत:
आपण जेव्हा “तिऱ्हाईत” व्यक्ती बनून स्वतःच्या वागण्याबोलण्यावर लक्ष ठेवून असतो, तेव्हा आपण शक्यतो योग्य व तार्किक निवड करतो.
खापर:
दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडल्याने आपले डोके तर वाचते, पण एखादा मौल्यवान धडा डोक्याबाहेर जातो व डोक्यात अंधार उरतो.
नाम:
“ईश्क” तो यूही बदनाम है दोस्तों, “अंधे, बहरे और लंगडे” होने के क्रोध, द्वेष, मत्सर, नैराश्य, डर, खुशी, आनंद, मोह ये भी कई नाम हैं।
समजू:
दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीला व दुरावस्थेला फक्त ‘तो स्वतःच जबाबदार’, आहे असे मानल्यामुळे आपण त्याची परिस्थिती समजू शकत नाही.
कल्पनेत:
ज्या गोष्टी कल्पनेत करायला, जाणायला व अनुभवायला आपण तयार होतो, त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात उतरवण्याची शक्यता जास्त.
चुका:
दुसऱ्यांच्या चुका सर्वस्वी त्याच्याचमुळे आणि आपल्या परिस्थितीमुळे व नाइलाजास्तव, या आपल्या प्रव्रुत्तीवर जरा लक्ष ठेवूया.
कल्पनाशक्ती:
मनश्चक्षुंसमोर हुबेहूब व स्पष्ट चित्र तयार करू शकणारी आपली कल्पनाशक्ती, ही शाब्दिक वर्णनापेक्षा खूपच परिणामकारक असते.