स्पष्टपणे व ठळकपणे रंगवून सांगितलेली चित्रकथा, मनावर प्रभाव पाडते आणि आपले द्रुष्टीकोन, वर्तन व बोलणे सुधारू शकते.
विनंती:
आपल्याला सक्रीय व सहकार्यवादी बनवायचे असेल तर, स्वतःला स्वीकारार्ह प्रश्न व सहज मान्य होणारी विनंती करायला शिकूयात.
मागणी:
एखादी मामुलीशी मागणी मान्य केल्यास, त्यानंतर येणारी मोठी मागणी, आपण मान्य करण्याची शक्यता खूप जास्त असते.
प्रतिमा:
ऐकलेले, बोललेले किंवा वाचलेले शब्द, आपल्या मनात एक प्रतिमा उभी करतात ज्यानुसार आपण नकळत वागतो व बोलतो.
लेबल:
आपण आपल्याला चिकटवलेल्या “लेबल”शी व लावलेल्या “उपाधी”शी सुसंगत असे विचार व वर्तन करायला प्रव्रुत्त होत असतो.
प्रभावीत:
आपल्याला विचारले जाणारे प्रश्न व त्यात वापरले जाणारे शब्द व विशेषणे, यांमुळे आपल्या आठवणी व उत्तरे प्रभावीत होतात.
मनातून:
आपल्याला आपल्या मनातून जे इतरांमध्ये हवे असते, पहायचे असते तेच आपण शोधत असतो आणि आपल्यालाही तेच दिसते व सापडते.
जवळीक:
आपल्याला ज्यांच्याशी जवळीक साधायची असते, त्यांचे आपण नकळतपणे अनुकरण व नक्कल करायला सुरुवात करतो.
शहाणपणा:
शहाणपणा म्हणजे स्वतःच्या मतावर व मतीवर विसंबण्याबरोबर जो निश्चित खरे, प्रामाणिक व परखड मत देईल, त्याचेही मत विचारात घेणे.
बहुसंख्य:
बहुसंख्य लोक जी गोष्ट टाळतात किंवा करतात, ती गोष्ट आपणही टाळतो किंवा करतो, मग ती योग्य असो की अयोग्य, चांगली असो की वाईट.