“बहुतेक सर्वांची वागणूक, मतं, निर्णय व आवडनिवड इतरांवरून ठरते, परंतु आपले मात्र तसे नाही”, असा आपला ठाम गैरसमज असतो.
संदेह:
एखाद्या गोष्टीत आपण कसे वागावे? यांबद्दल आपल्या मनात जर संदेह असेल तर, आपण इतरांचे अनुकरण करत असतो.
आवडीनिवडी:
सभोवतालच्या लोकांचे विचार, मते, सूचना, शिफारशी, नकळतपणे आपले निर्णय व आवडीनिवडी ठरवत असतात.
ठाम मत:
“आपण स्वतंत्र बुद्धीने निर्णय घेतो” व “आंधळेपणाने लोकांच्या मागोमाग जात नाही”, असे आपले ठाम मत, चुकीचे असू शकते.
प्रभाव:
कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन व पासपसंती करताना आपल्यावर, बहुमताचा व लोकप्रियतेचा प्रभाव खूप मोठा असतो.
प्रभाव:
आपली वैयक्तिक व्रुत्ती, प्रव्रुत्ती, श्रद्धा, विश्वास या सर्व गोष्टींवर सर्वमान्यतेचा व सामाजिक दबावाचा खूप प्रभाव असतो.
प्रवाहाबरोबर:
प्रवाहाबरोबर राहण्याच्या व वाहण्याच्या नादात आपण आपली बुद्धी, ईच्छा, गरजा व प्राधान्ये यांना बगल देण्याची शक्यता असते.
अनुकरणच:
काय करावे? कसे वागावे? यांचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावरही, स्वतः निर्णय घेताना, आपण सहसा कुणाचेतरी अनुकरणच करतो.
कळतंय:
“कळतंय पण वळत नाही” अशा वेळी बुद्धीऐवजी मनालाच जास्त कुरवाळून आपल्याला आपले काम करून घ्यायला शिकले पाहिजे.
मनोगंड:
आपल्या व्यक्तीमत्वामध्ये मनोगंड असतात कारण भूतकाळातील अनेक वर्षे एखादी विशिष्ट भावना आपण वारंवार दडपलेली असते.