जीवनात आपण ज्या गोष्टी मोजतो व ज्यांची वारंवार उजळणी करतो, त्या वाढत जातात म्हणून आनंद, सुख, दया, प्रेम व आभार मोजूया.
ध्येयं:
आपण जीवनात दोन ध्येयं ठरवायला हवीत, काहीतरी मिळवण्याचं ध्येय आणि त्याच्यापासून मिळणारा आनंद उपभोगण्याचं ध्येय.
आहे:
आपण आपल्याकडे काय काय नाही? याचा विचार थांबवून आपल्याकडे काय काय आहे? याचा विचार करायला सुरुवात करूयात.
वाटत:
प्रेम मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याची मागणी करणे सोडून देणे व ते परत मिळण्याची अपेक्षा न ठेवता ते वाटत रहाणे.
परवानगी:
आपण स्वतःवर इतके प्रेम करावे की आपल्या जीवनातील आनंद, सुख व आरोग्य यांवर नियंत्रणाची परवानगी इतर कोणालाही देऊ नये.
वैरभाव:
वैरभावात आपलेच रक्त जळते, सौंदर्य बिघडते, ह्रदय पिळवटते, शरीर थकते व डोके फिरते, तर आपला वैरी मात्र आरामात असतो.
हाती:
जेव्हा आपण एखाद्याचा द्वेष करतो तेव्हा आपल्या तहानभूक, झोप, आनंद, सुखसमाधान, आरोग्य या गोष्टी त्याच्या हाती सोपवतो.
प्रयत्न:
आपले कुटुंब, आपला व्यवसाय, आपले सगेसोयरे, आपली शरिरसंपदा यांनुसार आपण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करूयात.
शकतो:
आपण स्वतः जितके आनंदी व सुखी रहायचे ठरवू शकतो तितके राहू शकतो, परिस्थिती व लोक कसेही असले तरीही.
ताकद:
आपल्याला चांगले दिवस दाखवण्याची ताकद फक्त आपल्या मनातील विचारांमध्ये आहे, बाह्य जगातील कोणत्याही गोष्टींमध्ये नाही.