आपण आपल्या भावनांना आपल्या विचारांचा व शरीराचा पूर्ण ताबा दिल्यास आपण आपले स्वत्व व स्वातंत्र्य हरवून बसतो.
चर्चा:
चर्चाविषयाशी भावनिकद्रुष्ट्या न जोडलेली, स्वनियोजनात पारंगत असलेली व आपली शुभचिंतक व्यक्ती चर्चेसाठी सर्वोत्तम असते.
आकलन:
परिस्थितीचे आकलन वाढवण्यासाठी वेगळी मते व विरोधी मते मांडणाऱ्या व्यक्तींबरोबर चर्चा केलेली बरी, त्रास होत असला तरीही.
उपाय:
मनातील भीतींवर गाडी, बंगला, नोकरी, पगारवाढ, बढती, सहली, मैत्री, पार्टी, लग्न, मुले हे उपाय तात्पुरते व कुचकामी ठरतात.
निर्णय:
आपण जे वागतोय तो निर्णय कोणाचा आहे? आपला की आपल्या भावनांचा की मूल्यांचा की ठरवलेल्या निश्चयाचा याची पाहणी करायला शिकूया.
काल्पनिक:
भावनांमुळे परिस्थितीबद्दल काल्पनिक चित्रे तयार होतात, त्यानुसार मनातील निर्णय होतात, जे सत्यापासून खूपच वेगळे असू शकतात.
मूड:
जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा जगणं, जीवन, शिक्षण, नोकरी, लग्न, नातेसंबंध यांविषयीचे मोठे व महत्वाचे निर्णय घेणे टाळूया.
भावना:
आपल्या भावना या ढगांसारख्या असतात, त्या येतात व बदलतात, तात्पुरत्या राहतात किंवा जातात परंतु कायमस्वरूपी राहत नाहीत.
देतो:
आपण जी गोष्ट स्वतःला देतो व स्वतःसाठी करतो, तीच गोष्ट आपण इतरांना देऊ शकतो व इतरांसाठी करू शकतो.
प्रेरित:
अपयश व पराजय आपल्याला प्रेरणा देतो की खच्ची करतो, याचे बारकाईने निरिक्षण करुया व प्रेरित होण्याची यथार्थ निवड करुया.