कोणकोणत्या विचारांनी, शब्दांनी, घटनांनी, आठवणींनी, भावनांनी आणि हावभावांनी आपल्याला फरक पडतो याची हरघडी जाणीव ठेवूया.
बाहेर:
कोणते लोक, कोणत्या घटना, कोणता परिसर आणि कोणती भीती आपल्या भावना बाहेर काढतात, ते नेमकं समजून व उमजून घेऊया.
पाठ:
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक महत्त्वाचा पाठ म्हणजे कोणकोणते धडे दुर्लक्षित आहेत? व का? याची समज व जाणीव असणे.
पाठ:
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक महत्त्वाचा पाठ म्हणजे कोणकोणते धडे दुर्लक्षित आहेत? व का? याची समज व जाणीव असणे.
निरक्षरता:
मनाच्या अस्वस्थ व बेचैन अवस्थेपासून दूर पळणे किंवा त्या अवस्था टाळणे किंवा त्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मनाची निरक्षरता होय.
हाती:
“ही भावना योग्य, ती अयोग्य” अशी लेबले लावल्यावर “हे व्हायला हवे, ते नको” अशा अविवेकी अपेक्षांच्या हाती आपले मनस्वास्थ्य जाते.
नैसर्गिक:
सकारात्मक व नकारात्मक भावनांचे येणे, सोबत करणे व जाणे नैसर्गिक आहे, त्यांना चांगल्याच किंवा वाईटच समजणे अनैसर्गिक आहे.
स्व-जागरूक:
आपण स्वतः कसे? काय? कुठे? व का? आहोत, या प्रश्नांची उत्तरे शोधणे, जाणणे व त्यांचे भान ठेवणे म्हणजे स्व-जागरूक असणे.
तडजोडी:
आपण तात्पुरत्या व छोट्या फायद्यासाठी केलेल्या तडजोडी, आपल्या दिर्घकालीन जीवनात, आडकाठी ठरू शकतात.
प्रवास:
स्वतःचा स्वभाव व भावभावनांबद्दल क्षणोक्षणी शोध व माहिती घेणे व पुनर्शोध घेत रहाणे, म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास.