आपल्या जीवनाचा विकास म्हणजे आपला विकास आणि आपला विकास म्हणजे आपल्या ज्ञानाचा, कौशल्यांचा व क्षमतांचा विकास.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
आपण:
इतरांशी वागताना आपल्या आतमध्ये ज्या काही भावना व विचार येतात ते म्हणजे खरे आपण, जे आपण बोलतो व दाखवतो ते निनावी आपण.
अभिनय:
चांगलं वागण्याचा अभिनय करता करता, एक दिवस तो अभिनय आपली अभिव्यक्ती बनतो, नकळतपणे आपणही अभिनव होऊन जातो.
खेकडे:
आपले पाय खाली ओढणारे फारच थोडे खेकडे जनात असतात, उरलेले जवळपास सगळे खेकडे आपल्याच मनात मुक्कामी असतात.
पॉईंट:
इतरांचे वीक पॉईंट शोधत बसण्यापेक्षा, स्वतःचे स्ट्राँग पॉईंटस शोधून काढणे, जास्त फायदेशीर व सुखदायक आहे.
ठरवून:
चांगला विचार करण्याची क्रिया करण्याबरोबरच, ठरवून चांगली क्रीया करण्याचा विचार करणारा माणूस बनूयात.
उत्तम:
चुका करणे, त्यांची वैयक्तिक जबाबदारी घेणे आणि त्यात सुधारणा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधणे, चुका न करण्यापेक्षा उत्तम.
चूक:
आपण जर महत्त्वाच्या गोष्टीतसुद्धा टाळाटाळ करीत असेल, तर आपल्या मनात आपल्याकडून चूक होऊच नये ही अवास्तव अपेक्षा असू शकते.
पटणे:
आपण जे एखाद्याला पटवायला जातो, ते अगोदर जर आपल्याला पूर्णपणे पटलेले असेल, तर त्याला ते पटण्याची जास्त शक्यता असते.
विकास:
जर एखाद्या क्षेत्रात आपल्याला विकास करायचा असेल, तर स्वतःमध्ये विकास करणे हीच त्याची सुरुवात असते.