आपल्या बौद्धिक संपदेवर व क्षमतेवर, छुपा हल्ला करणारा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे दिर्घकालीन ताणतणाव, स्वतःवर बारीक लक्ष ठेवूया, त्याला वेळीच ओळखूया व स्वतःचे नियोजन करायला शिकूया.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
अडथळे:
कौटुंबिक कलह, भावनिक कोंडमारा, विचलित किंवा घाबरलेले मन व छोटेछोटे मानसिक धक्के हे बालकांच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत, हे समजून घ्यायला शिकूया.
पर्याय:
जेव्हा आपल्यासमोर खूप जास्त पर्याय असतात तेव्हा मनावरील दबावामुळे आपण गोंधळतो आणि निवड करणे टाळतो किंवा बहुसंख्य लोकांची नक्कल करतो, हे समजून घ्यायला शिकूया.
संबंध:
मैत्रीपूर्ण संबंध व प्रेमपूर्ण संबंध तयार होण्यामागील सर्वांत महत्त्वाचा व प्रभावकारी घटक म्हणजे नेहमीचे दिसणे, ओळख होणे व दररोजचे बोलणे चालणे, हे समजून घ्यायला शिकूया.
वैयक्तिक:
भावनिक व मानसिक आरोग्य मिळवणे हे आपले वैयक्तिक पातळीवरील ध्येय आहे, समाज, संस्कृती किंवा इतर कोणीही ते आपल्याला देऊ शकत नाही, हे समजून घ्यायला शिकूया.
दडपणे:
नकारात्मक भावना आपले वाटोळं करतील या गैरसमजातून त्या दाबणे किंवा दडपणे म्हणजे आपल्या जगण्यातून समाधान वजा करणे होय, हे समजून घ्यायला शिकूया.
पायरी:
आपल्या मनातील नकारात्मक भावनांनाही येण्याचे, राहण्याचे व अनुभवण्याचे तसेच त्यांसोबत जगण्याचे स्वातंत्र्य व मुभा स्वतःला देणे ही मानसिक आरोग्याची प्रमुख पायरी आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
Listen:
Listen to your heart, body, mind and soul. Listening to only heart will keep you alive. Listening to the all will make you alive.
भावनिक आरोग्य:
भावनिक आरोग्य म्हणजे दुःखी व निराश असतानासुद्धा आपण आनंदी व खुश आहोत असे दाखवणे नव्हे, तर आपण जसे आहोत तसेच असणे, दाखवणे व त्या स्थितीला जाणणे, हे समजून घ्यायला शिकूया.
एकावधानी:
आपला मेंदू एकावधानी आहे, द्विअवधानी नाही, अष्टावधानी तर नाहीच नाही, म्हणूनच आपण एका वेळी आपल्यासाठी महत्वाच्या अशा एकाच गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायला शिकूया.