पराभव:

आपल्या पराभवाचे यथायोग्य विश्लेषण करण्यापासून आपल्याला रोखणारे तीन शब्द म्हणजे दुर्दैवी मी, कमनशिबी मी आणि बिचारा मी; ते टाळण्याचा वारंवार प्रयत्न करूयात.

माया, काळजी व प्रेम:

माया, काळजी व प्रेम:
आपल्या मुलांना काय वाटत आहे? व त्यांच्या भावभावना काय आहेत? हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते व त्यादृष्टीने खूप सारे प्रयत्नही करावे लागतात. आपल्याला बहुतेक वेळा समजून व जाणून घेण्यासाठी ऐकणे, बोलणे व वागणे स्वाभाविकपणे व आपोआप येत नाही.
“मुला, तू रागावलेला दिसतोस!” किंवा “ते तुझ्यासाठी निराश होण्यासारखे असावे,” किंवा
“हं. आपल्याला त्या कार्यक्रमाला जाण्याबद्दल तुला काही शंका वाटत आहेत,” किंवा
“असे वाटते की तुला खरोखर त्या सर्व गृहपाठाचा राग आला आहे,” किंवा
“अरे, ते तुझ्यासाठी वैफल्याचे कारण झाले असावे!” किंवा
“एखाद्या जवळच्या मित्राचे दूर जाणे खूप त्रासदायक असू शकते.”
या प्रकारची विधाने आपल्या मुलांना दिलासा देतात आणि त्यांना त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्यास मोकळे करतात. या प्रकारची विधाने अगोदरच ठरविल्याशिवाय आणि वारंवार सराव केल्याशिवाय आपण बोलू व वागू शकत नाही.

आपण सुरूवातीला उत्तम प्रारंभिक प्रतिसाद देऊ शकतो की, “मला समजले आहे, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत, तुला काय वाटतं ते मला कळलं आहे”. पण तेथून पुढे संभाषण कोठे जाईल? आपण कशा पद्धतीने पुढे जावे? पुढे सल्ला देणे ठीक आहे का?” असे काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. अशा वेळी आपण सल्ला देणे थांबवणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांच्या समस्या त्वरित निकालात काढणे, आपल्याला आपल्या स्वतःच्या रोजच्या समस्यांच्या सरावाने खूप आवडते. भीजत घोंगडे न ठेवता प्रत्येक समस्येचे निराकरण करून मुलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे आपल्याला खूप सोपे, वेळ वाचवणारे व मोहक वाटते.
“आई, मला खूप थकवा आला आहे. ‘
“मग झोप काढ किंवा विश्रांती घे.”
“मला भूक लागली आहे.”
“मग काहीतरी खा.”
अशा प्रकारे त्वरित सल्ला देऊन लगेच अधिक चांगले व सर्वकाही आलबेल करून देण्याचा आपल्याला मोह होतो. कधीकधी आपण सुरुवात चांगली करतो आणि नंतर त्यांच्या अडचणी व समस्यांबाबत मुलांना दोष द्यायला लागतो. या त्वरित सल्ला किंवा दोष देण्याच्या मोहांचा आपण प्रतिकार करणे आपल्या मुलांच्या भावभावनांच्या व व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी गरजेचे व महत्त्वाचे आहे. त्यासाठी सल्ला देण्याऐवजी मुलांच्या भावना, विचार व व्यक्तीमत्व स्वीकारणे व त्यांच्या भावभावनांचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यांत सामावून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

आपण आपल्या मुलांना सल्ला न देता, दोष न देता व प्रश्न न विचारता त्याला त्याची संपूर्ण कहाणी सांगायला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. एक शब्ददेखील न बोलता जर आपण मनापासून फक्त त्याचे म्हणणे ऐकून घेतले तर आपली मुले त्यांच्या समस्यांवर स्वतःच उपाय शोधायला सुरुवात करतात. आपला विश्वास बसणार नाही इतके योग्य, चपखल व समर्पक उपाय शोधून मुले आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात. आपण
फक्त ऐकून घेणे आणि मुलांच्या भावनांना मान्यता व कबुली देणे या माध्यमातून आपल्या मुलांना भावनिक मदत करत असतो. हीच आपली आपल्या मुलांवर माया, काळजी व प्रेम असण्याची खरीखुरी कसोटी आहे.