मत:

इतरांचे “मत ऐकून व समजून घेतले” तरीही आपण मित्रत्वाने त्या “मताशी असहमत रहायला” व तसे “नम्रपणे बोलून दाखवायला” शिकूयात.

प्रेम:

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला जपणे, त्याच्या मताला जपणे, त्याच्या मनाला जपणे, त्याला अतिशय उच्च दर्जाची वागणूक देणे म्हणजे त्या व्यक्तीवर प्रेम करणे.

समजून घेणे:

दुसऱ्याला समजून घेणे म्हणजे त्याच्या भावनांचे समर्थन करणे व स्वीकार करणे तसेच मतभेद व्यक्त करणेस परवानगी देणे व त्या मतभेदाचाही स्वीकार व आदर करणे.

भान:

आपल्या द्रुष्टीकोनातून क्षुल्लक व फालतू असणाऱ्या गोष्टी, इतरांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या असू शकतात, याचे सदैव भान ठेवूया.