चांगलं:

“चांगलं वागून व बोलूनसुद्धा पाहीलं,” यातलं पाहणं वरवरचं असतं, मनापासून नसतं, म्हणून नेहमीच चांगलं वागू व बोलू हळूहळू ते मनापासून येईल.

पळवाटा:

आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल तर ते मान्य करणे, दिलगिरी व्यक्त करणे व माहीत करून घेण्यासाठी निश्चित कृती करणे, हाच उत्तम मार्ग; बाकी सर्व पळवाटा.

विवेक:

आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींचे महत्त्व लक्षात येणे म्हणजे बुद्धीमत्ता,
आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचे महत्त्व लक्षात येणे म्हणजे शहाणपण
आणि हे दोन्हीही स्थळ-काळ-वेळ यानुसार कमी-अधिक महत्त्वाचे आहेत हे लक्षात येणे म्हणजे विवेक.