दया घ्याना, दया द्याना:

दया घ्याना, दया द्याना:
आपण कितीही वाईट परिस्थितीत असलो व कितीही मोठ्या संकटात असलो तरीही आपल्याबरोबर एक जवळचा व चांगला मित्र असेल तर आपल्याला केवढा मोठा आधार वाटतो. आपण कसल्याही कौटुंबिक वादात असलो किंवा उत्पन्नाच्या बाबतीत कितीही कडकीत असलो तरीही जर आपल्याबरोबर कोणी दयाळू, काळजी घेणारी आणि समजून घेणारी व्यक्ती असेल तर आपण ती वेळ मारून नेऊ शकतो. जेव्हा आपण शारीरिक व मानसिक वेदना व त्रास भोगत असतो तेव्हा प्रेमाने व दयाळू भावाने बोललेल्या दोन गोष्टी आपल्या वेदनेवर मारलेली फुंकर असतात.
“मी हे पाहू शकतो की हे आपल्यासाठी कीती कठीण आहे”.
मी काही मदत करु शकतो का?”
ही दोन वाक्ये आपल्याला संकटाशी तोंड देण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतात. हे सर्व असे असले तरीही, आपल्यातील बरेच लोक दयाळू नसतात. कठीण परिस्थितीत असताना आपण स्वत:ला व इतरांना प्रेमाने व दयेने वागवत नाही.
बर्‍याचदा आपण क्रूर विचार व नकारात्मक भावनांच्या चक्रव्यूहात अडकतो. “मी अशक्त आहे, मी वेडा आहे, मी वाईट आहे, मी चुकीचे काम केले आहे, ही माझी चूक आहे, मी कधीही स्वत: ला माफ करू शकत नाही, मी असे करायला नको होते,” अशा विचारांच्या भोवऱ्यात आपण अडकतो. कठीण परिस्थितीत अशा प्रकारचे असभ्य विचार येणे हे नैसर्गिक असते आणि बर्‍याचदा ते पुन्हा पुन्हा येतात. जेव्हा आपण या विचित्र विचारांमध्ये बुडतो तेव्हा आपण आमच्या मूळ मूल्यांपासून दूर ओढले जातो. म्हणून आपल्याला या विचारांना लक्षात घेणे व त्यांना नाव देणे आवश्यक आहे. या माध्यमातून आपण त्यांच्यापासून दूर हटतो व त्यांच्या वेगवान व विघातक प्रवाहात वाहवत जात नाही.
आपल्या स्वतःबद्दलचा एक असभ्य विचार निवडा. उदा. “मी एक वाईट आई आहे. मी कमजोर व दुर्बळ व्यक्ती आहे.” आता शांतपणे स्वतःला सांगा की, “येथे एक निर्दयी व कठीण विचार आहे, आणि येथे एक कठोर स्व-निर्णय आहे”.
यानंतर या विचारांच्या अगोदर “माझ्या लक्षात आले आहे” हे शब्द जोडा. उदा. “माझ्या लक्षात आले आहे की येथे एक निर्दयी विचार आहे”. “माझ्या लक्षात आले आहे की येथे एक कठोर असा स्वत:चा निवाडा आहे”. यानंतर स्वत:ला आपल्या इंद्रियांच्या मदतीने सभोवतालच्या जगात, जगण्यात व जगरहाटात व्यस्त करून टाका.

जेव्हा आपण संघर्ष करीत असतो, वेदनेत किंवा संकटात असतो आणि दयाळू, काळजी घेणारा आणि आपल्याला समजून घेणारा एखादा आपल्या संपर्कात येतो तेव्हा वेदनांची व संकटांची तीव्रता कमी होत जाते.
अगदी सर्वात कठीण परिस्थितीमध्येही आपल्या दयाळूपणाच्या आणि काळजी घेण्याच्या मूल्यांनुसार आपण वागू शकतो व असे वागण्याचे व करण्याचे विविध मार्ग शोधू शकतो. दयाळूपणाच्या छोट्या छोट्या कृतींनीदेखील फरक पडू शकतो. दोन दयाळूपणाचे शब्दही वेदना कमी करतात. उदा. “हे खरोखरच खूप वेदनादायक आहे. मी तुमच्यासाठी येथे आहे”. अशी चार वाक्ये आपल्या वेदनेवर फुंकर घालतात.

जेव्हा आपण एखाद्यास वेदना, दु: ख आणि संघर्षात पहातो तेव्हा आपण दयाळूपणाच्या कोणत्या लहान लहान
क्रुती करू शकतो ते शोधा. प्रत्येक लहान व साध्या दयाळूपणाच्या क्रियाने
फरक पडतो. इतरांबरोबरच आपण स्वत:शी देखील दयाळूपणाने व प्रेमाने वागले पाहिजे. “मी दयाळू नाही. मी दयाळूपणास पात्र नाही. दयेने वागवण्याची माझी लायकी नाही.” अशा नकारात्मक विचारांना वेळीच ओळखा व त्यांना लक्षात घ्या. प्रत्येकाला मित्राची व आधाराची गरज असते. प्रत्येकाला दया व प्रेम आवश्यक आहे. जर आपण स्वत:शी दयाळूपणे वागलो तर आपल्याजवळ इतरांना मदत करण्यासाठी अधिक ऊर्जा असेल. स्वत:वर आणि इतरांवर दया करण्याने आपल्याकडे दया करण्यासाठी अधिक प्रेरणा असेल, म्हणूनच प्रत्येकास त्याचा फायदा होईल.

म्हणून स्वतःशी दयाळूपणाने बोलावे. “हे कठीण आहे. हे दुखवणारे आहे. ही जखम आहे. हे म्हणजे जखमेवर मीठ आहे”. परंतु मी अजूनही माझी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. मी अशा कठीण परिस्थितीत देखील स्वत:शी व इतरांशी दयाळू व प्रेमळपणाने वागू शकतो.” हीच वाक्ये आठवतील इतका त्यांचा दररोज सराव करायला हवा.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment