आपली नक्कल व अनुकरण करून मुले जवळपास सर्व नवीन गोष्टी शिकतात, म्हणून मुलांसमोर वागताना, बोलताना व प्रतिक्रिया देताना जरा सावध व्हायला शिकूया.
Category: Uncategorized
वाटते:
जी गोष्ट ‘बिलकुल व्हायलाच नको किंवा होणारच नाही’ असे आपल्याला वाटते, ती गोष्टच आपल्याला पुढे कधीतरी पायात पाय घालून पाडते, इतर कोणीही नाही.
कृतीतून:
भारदस्त शब्द व वाक्ये ऐकून आपण खूप प्रभावित व भ्रमिष्ट होऊ शकतो परंतु प्रत्यक्ष कृतीतून व अनुभवातून हे भ्रम कालांतराने स्वच्छही करायला शिकू शकतो.
मनाई:
आपल्या जीवनातील एखादी चांगली गोष्ट आपल्याला दुसरी योग्य व बरोबर गोष्ट करण्यास मनाई करीत असेल तर ती चांगली गोष्टही वाईट ठरू शकते, हे समजून घ्यायला शिकूया.
बंद:
एखाद्याचं मत व दृष्टिकोन ऐकून न घेणं म्हणजे स्वतःच्या विकासाचा व वैयक्तिक प्रगतीचा एखादा चांगला दरवाजा स्वतःहून बंद करण्यासारखे आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
बंध:
सकारात्मक असोत की नकारात्मक, बंध जोपर्यंत बंध असतात तोपर्यंत जीवनाला प्रवाही बनवतात, बंधन किंवा जोरजबरदस्ती झाल्यावर मात्र ते मृत डबक्यांचे बांध बनू शकतात.
प्रवृत्ती:
आपल्याला वरवर दिसते ती व्यक्ती व आपल्याला अंतर्मनात जाणवते व भावते ती प्रवृत्ती, आपण व्यक्तीला सोडून देऊया व प्रवृत्तीशी बंध तयार करायला शिकूया.
स्वतंत्र:
इतरांच्या प्रेमामुळे, दबावांमुळे व वेगळ्या निर्णयांमुळे जर आपण आपले निर्णय बदलत असू तर, आपण पूर्णपणे स्वतंत्र नाही आहोत, हे समजून घ्यायला शिकूया.
जाणून घेणे:
जेव्हा “काय करावे?” हे आपल्याला सुचत नाही तेव्हा, काहीही निर्णय घेणे टाळूया व आपल्याच भावनांना मानसिक, भावनिक व शारीरिक पातळीवर जाणून घ्यायला शिकूया.
प्रतिसाद:
आपल्या हातून घडणाऱ्या क्रिया व आपल्या बोलीतून येणारे शब्द जे आपल्या अंत:करणातील भावनांना, इच्छांना व गरजांना साद व साथ देत असतात त्यांना आपला प्रतिसाद म्हणायला शिकूया.