“तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा,” याऐवजी “मी जसे काही वागलो आहे व जे काही केले आहे, त्यावरून आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता”, हा दृष्टीकोन जतन करायला शिकूया.
Category: Uncategorized
मुक्त:
शंकाकुशंकांच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी आपल्याला ज्या शक्यतांना सामोरे जावे लागू शकते, त्या सर्व शक्यतांची कल्पनाशक्तीचा वापर करून माहिती व खात्री करून घ्यायला शिकूया.
शक्यता:
मनातील शंका, अनिश्चितता व असुरक्षितता यांनी पीडित असताना, आपण त्याबद्दल नवीन माहिती व ज्ञान मिळवून सकारात्मक शक्यतांवर लक्ष केंद्रित करायला शिकूया.
विश्वास:
आपल्याला माहिती असणे आणि शंका असणे यांमधील फरक म्हणजेच आपला स्वतःचा विश्वास असणे आणि विश्वास नसणे, तो समजून घेऊन स्वतःला समजून घ्यायला शिकूया.
दुरूस्त:
आपल्या मेंदूने व मनाने भूतकाळात बनवलेली मर्यादित मते व दृष्टिकोन, आपण पुन्हा आठवून, त्यांना आव्हान देऊन व त्यावर प्रक्रिया करून, दुरूस्त करून घ्यायला शिकूया.
मूळ:
जीवन जगताना आजच्या छोटया प्रश्नाला व ताणतणावाला शोधलेले तात्पुरते उत्तर उद्याला आणखी मोठ्या प्रश्नाचे मूळ नसावे, याची खबरदारी घ्यायला शिकूया.
तयारी:
आसपास केवळ स्पर्धा व चढाओढ आहे म्हणून त्यात उतरण्याऐवजी आपली स्वतःची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक पायरी व तयारी पाहून त्यात उतरायला शिकूया.
भावनिक गुंतवणूक:
भावनिक गुंतवणूक केलेल्या गोष्टी आपल्या चांगल्या व कायमच्या स्मरणात राहतात म्हणूनच आपल्या स्वप्नांमध्ये, ध्येयांमध्ये व उद्दिष्टांमध्ये भावनिक गुंतवणूक करायला शिकूया.
ठरवून:
“तू माझ्या मनासारखं वागत नाही तर मीही तुझ्या मनासारखं वागणार नाही”, असं वारंवार ठरवून आपण आपलंच मन:स्वास्थ्य बिघडवत असतो, हे समजून घ्यायला शिकूया.
परीक्षा:
आपल्या खऱ्या व्यक्तीमत्वाची, तत्वांची व जीवनमूल्यांची खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते जेव्हा एखाद्या प्रसंगात आपल्या सहनशक्तीचा अंत झालेला असतो.